एक तर तू राहशील राहशील, नाही तर.. ; आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे

एक तर तू राहशील राहशील, नाही तर.. ; आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे

| Updated on: Jul 18, 2025 | 2:57 PM

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनात झालेल्या  राड्यावर जोरदार चर्चा रंगली. यावेळी यावेळी शशिकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका मांडली.

की एकतर तु तर राहशील नाहीतर मी आशा धमकीचा मेसेज नेते जितेंद्र आव्हाड यांना आलेला असल्याचा मोठ खुलासा पवारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी सभागृहात बोलताना केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनात झालेल्या  राड्यावर जोरदार चर्चा रंगली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आपसात भिडलेले बघायला मिळाले.

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, या राज्यात देशाच्या घटना नियम ज्या सदनात आहे, त्याच सदनात असं होत म्हणजे बाहेर प्रतिमा काय झाली असेल? हे अत्यंत वेदनादायी आहे. पुर्वी वैचारिक देवाणघेवाण व्हायची, संघर्ष व्हायचा तो सदनापुरता, ही विश्वासार्हता आहे. पण आता वैयक्तिक द्वेष आणि दुष्मणी ठेवली जाते. सदनाबाहेर जे प्रकार होतात, ते आत यायला लागले आहेत. सभापतींनी कारवाई करायला सांगितली होती. मात्र कोण दोषी माहिती असूनही काल फक्त एकावर कारवाई झाली. ज्याने मार खाल्ला त्यावर कारवाई झाली, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

Published on: Jul 18, 2025 02:57 PM