गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने
शिवसेनेतील राज्यातील संघर्ष स्वागत कमानीच्या रूपाने झळकलाय. ठाकरे आणि शिंदे गटाच्या कमानी एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्यात शिवसेनेच्या या दोन्ही कमानीची जोरदार चर्चा सुरू आहे.
सांगली : 28 सप्टेंबर 2023 | सांगलीच्या मिरजेमध्ये गणेश विसर्जन निमित्ताने मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्याची परंपरा आहे. या स्वागत कमानीमध्ये शिवसेनेतला राज्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मिरजेमध्ये स्वागत कमानीवरून शिवसेना शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जागेवरून संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने दोन्ही गटांना स्वागत कमान उभारण्याची परवानगी दिल्यानंतर शहरातील श्रीकांत चौक येथे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमनेसामने स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सुरत लुटीनंतरच्या स्त्री आदराचा प्रसंग साकारण्यात आला आहे.
Published on: Sep 28, 2023 04:31 PM
