आंबेडकर यांच्यासोबतच्या युतीचा उद्धव ठाकरे यांनाच फटका बसणार, संदीपान भुमरे यांचा दावा; कारणही सांगितलं

आंबेडकर यांच्यासोबतच्या युतीचा उद्धव ठाकरे यांनाच फटका बसणार, संदीपान भुमरे यांचा दावा; कारणही सांगितलं

| Updated on: Feb 06, 2023 | 1:25 PM

चंद्रकांत खैरे यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, संदीपान भुमरे यांनी काय दिलं चॅलेंज?

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या युतीचा फटका उद्धव ठाकरे यांना बसणार आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी केले आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. मतदार या युतीला स्विकारणार नाही. मतदार हा बाळासाहेब यांच्या शिवसेनेला पसंती देणार, असा विश्वासही संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची स्वतःची वेगळी ताकद आहे. या ताकदीचा ठाकरे गटाला फायदा होणार की नाही, यावर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली त्याचा फायदा तर होणार नाही पण तोटा मात्र नक्की होईल.

‘2024 ला बघू कोण कोणाला ओळखंत ते.. चंद्रकांत खैरे यांनी घरी बसवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही, असा पलटवार संदिपान भुमरे यांनी फक्त पैठणच आळखतं असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर केला आहे.

Published on: Feb 06, 2023 01:25 PM