…सध्या मस्तपैकी जाहिरात सुरू आहे; अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

…सध्या मस्तपैकी जाहिरात सुरू आहे; अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Apr 03, 2023 | 2:42 PM

आम्ही पण सरकारमध्ये होतो. परंतु आम्ही कधी जाहिरातबाजी केली नाही. 1999, 2004, 2009 ला लोकांनी आम्हा निवडणून दिलं

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून नुसती जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोप विरोधक सतत करत आहेत. आताही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जाहिरातीवरून खडे बोल सुनावले आहेत. तर एखादं प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखं सारखं लोकांना जाहिरात दाखवावी लागते तसं हे सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तर शिंदे-फडणवीस हे लोकांनी आपल्याला विसरू नये म्हणून जनतेच्या टॅक्सरूपी जमा झालेल्या पैशातून त्यांची मस्तपैकी जाहिरातबाजी करत असल्याचे ते म्हणाले. पण हीच जाहिरातबाजी त्यांनी सरकारच्या योजनांवर केली असती तरी चाललं असतं.

आम्ही पण सरकारमध्ये होतो. परंतु आम्ही कधी जाहिरातबाजी केली नाही. 1999, 2004, 2009 ला लोकांनी आम्हा निवडणून दिलं. तर 2014 ला आम्ही बाजूला गेलो. 1999, 2004, 2009 ला आम्ही काही जाहिरातबाजी केली नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 03, 2023 02:42 PM