फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड मोठ्या अडचणीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट आणि गायकवाड यांना चांगलंच फटकारलं आहे.
मंत्री शिरसाटांचा बेडरुममधला पैशांची बॅग असलेल्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिंदे, फडणवीसांनी दोघांनाही खडसावलं आहे. शिंदेंनी दोन्ही नेत्यांना झापत वॉर्निंग दिली आहे. तर फडणवीसांनी शिरसाटांना तंबी दिली आहे. कँटिन मारहाण प्रकरणावरून गायकवाड यांचा देखील चांगलाच पान उतारा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून या दोन्ही नेत्यांना वॉर्निंग मिळाली आहे. पैशांची बॅग असलेल्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाटांना सुनावलं आहे. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही, अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री शिरसाटांना मिळाली आहे. तर शिंदेंनी देखील या दोन्ही नेत्यांना झापलं आहे. गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या. तुमच्याकडे दाखवलेलं बोटे हे माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात? तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, असा थेट इशाराच शिंदेंनी या दोन्ही नेत्यांना दिला आहे.
