Chiplun मधील बैठकीतच परबांच्या कार्यपद्धतीवर नाराजी जाहीर

| Updated on: May 09, 2022 | 8:18 PM

4 तास पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्या बद्दलच्या नाराजीचा सूर उमटला. पालकमंत्री फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळा ते जिल्ह्यात दिसत नाहीत. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतापले होते.

Follow us on

YouTube video player

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री हटवा चिपळूणमधील बैठकीत पाच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पाच तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. अनिल परब राष्ट्रवादी काँग्रेसला कामं देतात आणि शिवसेनेच्या लोकांना डावलतात असे सांगत पक्ष निरीक्षक सुधीर मोरे आणि शरद बोरकर यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 4 तास पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्या बद्दलच्या नाराजीचा सूर उमटला. पालकमंत्री फक्त झेंडा वंदन आणि दापोलीत राजकारण करण्यासाठी येतात. इतर वेळा ते जिल्ह्यात दिसत नाहीत. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतापले होते. चिपळूणमधील पुष्कर हॉलमध्ये ही बैठक पार पडली.