कितीही दबावतंत्र वापरलं तरी Shivsena घाबरणार नाही; Eknath Shinde यांचं स्पष्टीकरण

कितीही दबावतंत्र वापरलं तरी Shivsena घाबरणार नाही; Eknath Shinde यांचं स्पष्टीकरण

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 7:23 PM

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदेंनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलंय. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. सरकार कोणाचंही जास्त काळ राहत नाही बदलत असतं त्यामुळे विचार करावा. मुंबईत संकटकाळात कोण धावून जातंय हे सगळ्यांना माहिती आहे.

उत्तर प्रदेश : शिवसेना जशी सत्तेत आली आहे तशी अनेकांची पोटदुखी सुरू झालीय. शिवसेनेनं अनेक अनुभव बघितलेत. शिवसेना कधी घाबरली नाही आणि घाबरणारही नाही. शिवसेना मंत्री एकनाथ शिंदेंनी किरीट सोमय्यांना आव्हान दिलंय. आम्ही महाविकास आघाडी म्हणून नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. सरकार कोणाचंही जास्त काळ राहत नाही बदलत असतं त्यामुळे विचार करावा. मुंबईत संकटकाळात कोण धावून जातंय हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनाच असेल. उत्तर प्रदेशात चांगला प्रतिसाद पक्षाला आम्हाला मिळतोय हे तुम्ही पाहताय. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत सुभाष देसाई उपस्थित आहेत. संजय राऊत युपीत आहेत, मंत्री आदित्य ठाकरे आहेत, मी आहे. मात्र मतभेद असण्याचं कारण नाही.