Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं कोण? रामदास कदमांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव

Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाकरे ब्रँड म्हणजे नेमकं कोण? रामदास कदमांनी घेतलं ‘या’ नेत्याचं नाव

| Updated on: Jun 07, 2025 | 1:05 PM

राज ठाकरेंचा ब्रँड होऊ शकतो पण उद्धव ठाकरेंचा ब्रँड कधीच होऊ शकत नाही, ठाकरे ब्रँडवर बोलताना रामदास कदमांनी स्पष्टच सांगितलं...

राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? तसे सकारात्मक संकेतही देण्यात आले आहेत आणि चर्चाही सुरू झाल्यात. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? याकडे राज्यातील मराठी माणसाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूची युती झाली तर ठाकरे ब्रँड टिकेल अशी काही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. यासंदर्भात सवाल केला असता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपलं स्पष्ट मत मांडत उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र डागलं.

‘बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक भूमिका आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी या भूमिकेला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन केलंय. त्यामुळे तो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होऊ शकत नाही. काँग्रेसच्या विरोधात जाऊन बाळासाहेबांनी संघर्ष केला. त्यांच्यासोबतच जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत.’, असं रामदास कदम म्हणाले. तर ठाकरेंचा ब्रँड म्हणजे बाळासाहेबांचा ब्रँड टिकला पाहिजे. पण उद्धव ठाकरे हा ब्रँड होऊ शकत नाही, असेही म्हणाले.

Published on: Jun 07, 2025 01:05 PM