Video | नारायण राणे यांनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही – विनायक राऊत
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी चिपी विमातळाच्या मुद्द्यावरुन भाजप मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय.
मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्षे काहीच केलं नाही, असा आरोप राऊत यांनी केलाय. तसेच येत्या 7 ऑक्टोबरपासूनच चिपी विमान उड्डाण प्रवास सुरु होणार आहे. चीपी विमानतळावरील उड्डाणाचं सगळं श्रेय हे कोकणवसीयांचं आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.
