Ladki Bahini Yojana : ‘लाडकी बहीण’च्या निधीवरून संजय शिरसाट भडकले, थेट अजित दादांच्या अर्थ खात्यावर निशाणा

Ladki Bahini Yojana : ‘लाडकी बहीण’च्या निधीवरून संजय शिरसाट भडकले, थेट अजित दादांच्या अर्थ खात्यावर निशाणा

| Updated on: May 03, 2025 | 5:55 PM

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवल्याने मंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागाकडून आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायांसाठी असलेला निधी वळवण्यात आल्याची बातमी समोर आली. या बातमीनंतर शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘माध्यमांमधून मला माझ्या खात्याचे पैसे वर्ग केल्याचे समजले. त्याची मला कल्पना नाही. माहिती नाही. परंतु सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करा. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही’, असे संजय शिरसाट म्हणाले. तर अर्थ विभागाकडून मनमानी सुरु आहे. माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही? माझे १५०० कोटींची देणी बाकी आहेत. ते वाढत असल्याचे म्हणत शिरसाटांनी अर्थ विभागावर नाराजी व्यक्त केली. बघा संजय शिरसाट काय म्हणाले?

Published on: May 03, 2025 05:55 PM