वाघाचं कातडं ते मोदी-शाहांचे बूट चाटणं… एकनाथ शिंदे अन् संजय राऊत यांच्यात वार-पलटवार
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन गट निर्माण झाले. या झालेल्या दोन शिवसेनेमुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जोरदार घणाघात केल्याचे पाहायला मिळाले. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इतकंच नाहीतर वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तर यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय. ‘काही जणांचा भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांचे विचार पाळतो. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बूट चाटणं हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
Published on: Jun 10, 2025 01:48 PM
