VIDEO | तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर ठाकरे-फडणवीस यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती

VIDEO | तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर ठाकरे-फडणवीस यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती

| Updated on: Aug 26, 2023 | 4:16 PM

शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील निकटवर्तीयांची नियुक्ती ही तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर झाली आहे. त्यात ठाकरे गटातील एका नेत्याची नियुक्ती झाल्याने सध्या जोरादर चर्चा होत आहे.

मुंबई : 26 ऑगस्ट 2023 | देशातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांची नियुक्ती आहे. याबाबतची यादी जाहीर झाली असून या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांची नावे आहेत. त्यामुळे राज्यात सध्या समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राज्यात माहाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर त्यांची सदस्यपदी नियक्ती झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टवर संधी मिळाली आहे.

तर देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी जाहीर केली. विशेष बाब म्हणजे सत्ता नसताना देखील नार्वेकर यांची तिरूपती देवस्थान ट्रस्टवर नियुक्ती झाल्याने चर्चा होत आहेत.

Published on: Aug 26, 2023 04:15 PM