Sanjay Raut : पंतप्रधान खुशमिजास, त्यांचा चेहरा पाहता असं वाटतं…. देश युद्धाच्या तयारीत अन् राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारचे धोरण आणि भूमिकेवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच नेम धरला. बघा काय केला हल्लाबोल?
देशात युद्धाची तयारी असली तर तो पंतप्रधान राजधानीतून बाहेर टंगळ-मंगळ करायला बाहेर फिरत नाही. कश्मीरमध्ये मोठं हत्याकांड झालं. आमचे पंतप्रधान बिहारला प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू बोलले. नुकतेच मुंबईत आले आणि ९ तास नट-नट्यांसोबत राहिले, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी ते असेही म्हणाले, आंध्रप्रदेशचे नेते पवन कल्याणसोबत हास्यविनोद करताना पंतप्रधान दिसले. पंतप्रधानांचा चेहरा पाहता एकंदर त्यांना पाहता, वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावर दुखाची एकही लकेर दिसली नाही. पंतप्रधान खुशमिजास आहेत आम्हीच चिंतेत आहोत. पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा… पण मोदींच्या चेहर्यांवर युद्धाची चिंता दिसत नाही, असा आरोप राऊतांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी धडा शिकवणार आहेत. पण कधी शिकवणार हेच समजत नाही. ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच वाटते, असा टोलाही राऊतांनी मोदींना लगावला.
