Uddhav Thackeray : तिन्ही पक्षांचा मालिक एक, अॅनाकोंडा त्यांना गिळल्याशिवाय… उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा
महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील पक्षांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. "नावाला पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वांचा मालक एकच आहे," असे ठाकरे म्हणाले. महायुतीमधील घटक पक्ष हे एकाच शक्तीचे बी टीम असून, ॲनाकोंडाप्रमाणे ते इतर पक्षांना गिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतर्गत प्रवेशांवरून महायुतीत नाराजी नाट्य सुरू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीतील पक्षांवर जोरदार टीका केली आहे. “नावाला पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वांचा मालक एकच आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महायुतीत सहभागी असलेले पक्ष हे एकाच शक्तीच्या बी टीम असून, त्या सर्वांचा मालक एकच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, महायुतीमधील पक्षांमध्ये सुरू असलेल्या प्रवेशांवरून नाराजी नाट्य दिसून येत आहे. एकमेकांचेच प्रवेश घेतले जात आहेत, असे सांगत ठाकरे यांनी महायुतीला ॲनाकोंडाची उपमा दिली. हा ॲनाकोंडा दोन्ही मित्रपक्षांना गिळल्याशिवाय थांबणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Published on: Dec 06, 2025 04:04 PM
