अनिल परब यांना मोठा दिलासा; 28 एप्रिलपर्यंत संरक्षण

| Updated on: Apr 19, 2023 | 4:00 PM

परब हे दापोली येथील बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरणी आरोपी आहेत. तसेच या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत

Follow us on

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाईचा ससेमिरा सुरूच आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश देताना 28 एप्रिलपर्यंत कारवाईपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे परब यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. आजची सुनावणी वेळेअभावी तहकूब झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे. परब हे दापोली येथील बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरणी आरोपी आहेत. तसेच या संदर्भात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत. त्या प्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश ईडीला देण्यात आले आहेत. याच्याआधी ही याप्रकरणी 19 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती.