राऊतांचा इशारा, म्हणाले, आम्ही तयार आहोत

| Updated on: Mar 21, 2023 | 11:58 AM

भाजपला निवडणुका जिंकता याव्यात, भाजपला सत्ता मिळवता यावी यासाठी सगळ सुरू आहे. मात्र कोणत्याही निवडणुका एकत्र घेतल्यास आम्ही तयार आहोत, असा दमच त्यांनी भाजपला भरला आहे

Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका या लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात असा प्रस्ताव भाजपच्या विचाराधीन आहे. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच महापालिकांच्या निवडणूका का रखडवून ठेवल्यात? असा सवाल केला आहे.

राऊत यांनी, भाजपला निवडणुका जिंकता याव्यात, भाजपला सत्ता मिळवता यावी यासाठी सगळ सुरू आहे. मात्र कोणत्याही निवडणुका एकत्र घेतल्यास आम्ही तयार आहोत, असा दमच त्यांनी भाजपला भरला आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका का रखडवून ठेवल्या? भाजपचं एकच धोरण आहे सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता. त्यासाठी अडाणी, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला पाठीशी घालायचं. या धोरणानुसार राज्य चाललं असेल तर निवडणूका आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. तुम्ही निवडणुका कधीही घ्या आम्ही तयार असल्याचं म्हटलं आहे.