Wardha जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानापूर्वी शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर

| Updated on: Mar 22, 2022 | 10:03 PM

विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बाचाबाची झाली. मुंबई येथील शिवसंपर्क अभियानासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आलाय. विश्रामगृहाच्या कावेरी या खोलीत जाऊन टेबलाची तोडफोड करण्यात आली.

Follow us on

YouTube video player

वर्धा : जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानापूर्वी (Shiv Sampark Abhiyan) शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. वर्धेच्या स्थानिक विश्राम गृहात शिवसेना संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुख बसले असता तोडफोड झाली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे यांनी तोडफोड केल्याची माहिती आहे. विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत बाचाबाची झाली. मुंबई येथील शिवसंपर्क अभियानासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आलाय. विश्रामगृहाच्या (Rest house) कावेरी या खोलीत जाऊन टेबलाची तोडफोड करण्यात आली. आजपासून शिवसंपर्क अभियान सुरू झाले. खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या संपर्काची जबाबदारी देण्यात आली आहे. तुमाने दौऱ्यावर येण्यापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आले असता हा वाद झाला. मागील काही दिवसापासून जिल्ह्याच्या शिवसेनेत वाद सुरु आहे.