Sanjay Raut | कॉंग्रेसशिवाय आघाडीचा विचार अयोग्य: संजय राऊत

Sanjay Raut | कॉंग्रेसशिवाय आघाडीचा विचार अयोग्य: संजय राऊत

| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 7:35 PM

यूपीए कुठे आहे? असं ममता बॅनर्जी विचारलं ते योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार यूपीए मजबूत करावं असं म्हटलं आहे. देशाच्या राजकारणात यूपीएचं महत्त्व राहिलं पाहिजे. यूपीए नाहीये तर एनडीए तरी कुठे आहे? असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, असं राऊत म्हणाले.

मुंबई: यूपीए कुठे आहे? असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यात दम आहे. पण काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. कोणताही वेगळा फ्रंट केल्यास त्याचा भाजपलाच फायदा होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी मोठ्या नेत्या आहेत. भाजपच्या विरोधात जी लढाई सुरू आहे. त्यातील त्या सर्वात महत्वाच्या योद्धा आहेत. इतर राज्यातही अनेक लोक लढत आहेत. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एक संघर्ष केला आणि विजय मिळवला. तो प्रेरणादायी आहे. यूपीएचं काय करायचं हे हा सवाल केला जात आहे. यूपीए कुठे आहे? असं ममता बॅनर्जी विचारलं ते योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार यूपीए मजबूत करावं असं म्हटलं आहे. देशाच्या राजकारणात यूपीएचं महत्त्व राहिलं पाहिजे. यूपीए नाहीये तर एनडीए तरी कुठे आहे? असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, असं राऊत म्हणाले.