Suryakant Dalvi | रामदास कदमांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ऑ़डिओ क्लिप प्रकरणी सूर्यकांत दळवींचा आरोप

Suryakant Dalvi | रामदास कदमांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ऑ़डिओ क्लिप प्रकरणी सूर्यकांत दळवींचा आरोप

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 8:32 AM

रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. प्रसाद कर्वे हे कदम यांचे पीए असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कदम यांनी प्रसाद कर्वे माझा कधीच पीए नव्हता आणि माझे व त्याचे काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम अचानक पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले आहेत. कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांकडे रसद पुरवल्याचं या क्लिपमधून स्पष्ट दिसत आहे. कदम यांनी हे आरोप फेटाळले आहे. मात्र, शिवसेनेत कोण कुणाला संपवतंय आणि कोण कुणाच्या विरोधात आरोप करतंय हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. प्रसाद कर्वे हे कदम यांचे पीए असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कदम यांनी प्रसाद कर्वे माझा कधीच पीए नव्हता आणि माझे व त्याचे काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या कथित क्लिपमधून कदम हे कर्वेंना सोमय्यांना आपल्याकडे घेऊन येण्यास सांगताना दिसत आहेत. तसेच अनिल परब यांच्या विरोधात झालेल्या कारवायांची माहितीही ते वारंवार घेताना दिसत आहेत. तसेच परब यांच्या कार्यालयावर हातोडा पडणार असल्याचा आनंद व्यक्त करतानाही कदम दिसत असल्याचं या कथित क्लिपमधून दिसून येत आहे.

Published on: Oct 03, 2021 08:32 AM