Sanjay Shirsat : तुमच्यात धमक असेल तर तुम्हीच आमदाराला मारून टाका… शिरसाटांचं बच्चू कडूंना चॅलेंज
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. बच्चू कडू यांच्या आमदाराला मारून टाका या वक्तव्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, तुमच्यात धमक आहे तर तुम्हीच आमदाराला मारा ना, असं म्हणत आव्हान दिलंय.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली मते स्पष्ट केली. बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या आक्रमक वक्तव्यावर शिरसाट यांनी जोरदार टीका केली.आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापून टाका, असं वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट म्हणाले, तुम्ही इतरांना प्रवृत्त करण्यापेक्षा, तुमच्यात धमक असेल तर तुम्हीच आमदाराला मारून टाका. हे असे बेताल वक्तव्य करून माध्यमांमध्ये येण्याचा प्रकार योग्य नाहीये.
याशिवाय, त्यांनी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या ९६ लाख खोट्या मतदारांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग सक्षम असून त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करावी, असे ते म्हणाले. पुण्यातील शनिवारवाड्यासमोर भगवा झेंडा फडकवल्याने झालेल्या जातीय तणावावर बोलताना, शांतता बिघडवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शिरसाट यांनी केली. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी “बकवास” असे संबोधत, शिंदे साहेबांची उंची वाढते, तर राऊतांची घटते असे म्हटले.
