Sanjay Raut : कर्जमाफी देता येत नाही तर…; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

Sanjay Raut : कर्जमाफी देता येत नाही तर…; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

| Updated on: Mar 30, 2025 | 5:07 PM

Sanjay Raut On Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी मिळणार नसल्याचं म्हणत कर्जाची रक्कम भरण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर आज उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. नैतिकतेच्या आधारे अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे असंही यावेळी राऊतांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग त्यांनी केला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यापासून कर्जमाफीपर्यंत आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे, असं राऊतांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 30, 2025 05:07 PM