भाषणं करुन सत्ता मिळत नाहीः सचिन आहिर
मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे,ही सत्ता टिकून आहे ती, मुंबईकरांच्या विश्वासामुळे. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जी घोषणा करण्यात आली आहे, त्याचा काही परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार नाही.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे,ही सत्ता टिकून आहे ती, मुंबईकरांच्या विश्वासामुळे. त्यामुळे कालच्या मेळाव्यात जी घोषणा करण्यात आली आहे, त्याचा काही परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार नाही. कारण येथील लोकांना माहिती आहे. कालच्या सभेत जी वक्तव्य करण्यात आली ती का आणि कशी करण्यात आली आहेत, त्याचा संदर्भ अनेकांना समजला आहे. त्यामुळे फक्त वक्तव्य करुन सत्ता मिळत नसतात अशी टीका शिवसेनेचे नेते सचिन आहिर यांनी केली. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही, आणि त्या निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार असा विश्वासही सचिन आहिर यांनी व्यक्त केला.
