Ramdas Kadam : उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे झाले नाही तर… ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून कदमांची आगपाखड
'आता नामुष्की आलीये. सगळं संपलंय. म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हाक दिली आहे. स्वतःचं राजकारण जीवंत राहण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना साद घातली. हा त्यांचा शेवट आहे', असं रामदास कदम म्हणाले.
उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्रित विजयी मेळावा उद्यावर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात हिंदी सक्तीचा जीआरच्या रद्द केल्यानंतर मराठीचा विजय म्हणून ५ जुलै रोजी विजयी मेळावा ठाकरे बंधूंकडून साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, मेळाव्यानंतर युतीची चर्चा सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशातच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे नाही झाले तर राज ठाकरेंचे कसे होणार? उद्धव ठाकरे कोणाचाही भाऊ होऊ शकत नाही.’, असा घणाघात रामदास कदम म्हणाले. इतकंच नाहीतर रामदास कदमांचे नगरसेवक फोडून शिवसेनेत घेतले गेले तर दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर राज्याचं हित नेमकं कसं होणार? असा सवालही कदमांनी केलाय.
Published on: Jul 04, 2025 01:46 PM
