Sanjay Shirsat VIDEO : हातात सिगारेट, पैशांनी भरलेली बॅग अन्… शिंदेंच्या मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

Sanjay Shirsat VIDEO : हातात सिगारेट, पैशांनी भरलेली बॅग अन्… शिंदेंच्या मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 11, 2025 | 5:30 PM

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ त्यांच्याकडे असल्याचे म्हणत मोठा दावा केला आहे. बघा व्हायरल होणारा व्हिडीओ नेमका कोणता आहे?

महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. पैशांनी भरलेल्या बॅगांसह संजय शिरसाट यांचा व्हिडीओ माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा व्हायरल होणारा एका हॉटेलमधला असल्याचे पाहायला मिळत आहे.

 दरम्यान, संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नुकतीच एक नोटीस पाठवली. याबद्दल त्यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिली. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा शिंदे गटासाठी एक मोठा झटका मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) बहुचर्चित ‘व्हिट्स हॉटेल’च्या लिलाव प्रकरणाशी संबंधित असल्याने संजय शिरसाट यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या हॉटेलच्या लिलावातील व्यवहारांवरून काही अनियमितता असल्याची तक्रार आयकर विभागाकडे आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Jul 11, 2025 02:21 PM