Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांची नाराजी उघड, सर्वात जुना मीच पण… 2019 च्या मंत्रिमंडळात… जाहीरपणे काय म्हणाले?
चिपळूणमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव यांनी जाहीरपणे 2019 च्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं नाराजी बोलून दाखवली. बधा काय म्हणाले भास्कर जाधव?
2019 च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं, सर्वात जास्त जुना, सर्वाधिक वेळा निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही मात्र त्यानंतर मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटल्याचे पाहायला मिळाले. चिपळूण येथील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. ते पुढे असेही म्हणाले, माझ्या पुढ्यातील ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पुढ्यातील ताट ओढलं नाही. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे गद्दारी करतात ते महागद्दार आहेत, असं म्हणत पक्षातील विरोधकांनाच भास्कर जाधव यांनी घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 06, 2025 06:55 PM
