Sandeep Deshpande : म्हणून कोणाचे पाय चाटले नाही, संदीप देशपांडेंचं राऊतांना खरमरीत उत्तर
Sandeep Deshpande Tweet : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊतांच्या टीकेवर ट्विट करत उत्तर दिलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता ट्विट करत खासदार संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. आम्ही नवीन, पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही. जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांच्या टीकेवर ट्विट करत उत्तर दिलं आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू झालेला आहे. एकीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं मनोमिलन सुरू असताना दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची जुंपलेली बघायला मिळत आहे. काल संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना बोलताना संदीप देशपांडे राजकारणात नवीन असल्याचा टोला लगावला होता. त्यावर आता देशपांडे यांनी ट्विट करून राऊतांना खरमरीत उत्तर दिलं आहे.
Published on: Jun 23, 2025 11:05 AM
