Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचा संप; मुंबईतील सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरही सहभागी
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आज संपावर आहेत. या संपात मुंबईतील कर्मचारीही सहभागी झालेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आज संपावर आहेत. या संपात मुंबईतील कर्मचारीही सहभागी झालेत. मुंबईतील सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरही यात सहभागी झालेत. सायन हॉस्पिटलच्या चौथ्या श्रेणीतील डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात आज संपावर गेलेले आहेत. जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, असं या क्रमचाऱ्यांचं म्हणणं आहे. जुनी पेन्शन लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे सायन हॉस्पिटलमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोवर कामावर न येण्याचा निर्णय या डॉक्टर्सने घेतला आहे.
