Maratha Reservation Protest : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं… आंदोलकांनी सुळेंच्या कारला घेरलं अन् बॉटल भिरकवल्या, नेमकं घडलं काय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांचं उपोषण देखील सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी राजकीय नेते मंडळी जाऊन त्यांची भेट घेत आहे. अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर दाखल होत […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांचं उपोषण देखील सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी राजकीय नेते मंडळी जाऊन त्यांची भेट घेत आहे. अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर दाखल होत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? त्यांचं म्हणणं जाणून घेतल्या. दरम्यान, ही भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आंदोलनस्थळावरून बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांचा एकच गदारोळ पाहायला मिळाला. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची कार अडवत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करत शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं म्हटलं. इतकंच नाहीतर सुप्रिया सुळेंना त्यांच्या कारपर्यंत पोहचू न देता…त्यांच्या कारवर आंदोलकांनी पाण्याच्या पाटल्या भिरकवल्या… बघा व्हिडीओ नेमकं काय घडलं?
