शिपायाच्या लेकीचं अभूतपूर्व यश, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश

| Updated on: Jan 24, 2023 | 3:40 PM

पैशाने शिपाई असलेल्या आई-वडिलांच्या मुलीने पहिल्याच प्रयत्नामध्ये न्यायाधीशांची परीक्षा उत्तीर्ण करत आई-वडिलांची मान उंचावली आहे. स्नेहा पुळूजकर असं या न्यायाधीश बनलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

Follow us on

पैशाने शिपाई असलेल्या आई-वडिलांच्या मुलीने पहिल्याच प्रयत्नामध्ये न्यायाधीशांची परीक्षा उत्तीर्ण करत आई-वडिलांची मान उंचावली आहे. स्नेहा पुळूजकर असं या न्यायाधीश बनलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. आई उज्वला जिल्हा आरोग्य विभागात शिपाई तर वडील सुनील हेही जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईच म्हणून कार्यरत आहेत. तीन मुलांचा सांभाळ करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना नेहमीच काटकसर करावी लागायची. तरीपण, मुले नोकरीला लागली की परिस्थिती नक्की बदलेल ही जिद्द उराशी बाळगून आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढला. ही जाण ठेवत मुलीने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. सोलापूरच्या शेळगीत राहणारी  ही स्नेहा सुनील पुळुजकर नुकतीच न्यायाधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.