Sonam Raj Kushwaha Case : प्रेम, लग्न, हनिमून, विश्वासघात आणि हत्या; बेवफा सोनमची हादरवणारी कहाणी..

Sonam Raj Kushwaha Case : प्रेम, लग्न, हनिमून, विश्वासघात आणि हत्या; बेवफा सोनमची हादरवणारी कहाणी..

| Updated on: Jun 10, 2025 | 11:18 PM

Sonam Raja Raghuvanshi murder : इंदोरच्या राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनमच्या कृतीने संपूर्ण देश हादरून निघाला आहे. सोनमच्या कहाणीचा हा स्पेशल रिपोर्ट..

प्रेम, लग्न, हनिमून, विश्वासघात आणि हत्या. अशी एक जटील कहाणी जिच्या उलगडण्याने संपूर्ण देशात खळबळ माजली. माणूस किती क्रूर असू शकतो याच उदाहरण म्हणजे राजा रघुवंशी हत्याकांड आणि या हत्येची मुख्य सूत्रधार राजा रघुवंशी याची पत्नी सोनम. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये राहणाऱ्या सोनमचं 11 मेला राजा रघुवंशी सोबत लग्न झालं. मात्र सोनमचं प्रेम राजकुशवा नावाच्या तरुणावर होतं. राजकुशवा सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात काम करायचा. वयाने 5 वर्ष लहान असणाऱ्या राज सोबत सोनमचं प्रेमप्रकरण सुरू होतं. मात्र कुटुंबाने तिचं लग्न राजा रघुवंशी सोबत लाऊन दिलं. 20 मे ला दोघं हनिमुनसाठी गेले. पण याच हनिमूनमध्ये सोनम आणि तिच्या प्रियकराने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. लग्नाच्या पाचव्याच दिवशी राजाच्या हत्येचा कट शिजला. आपण विधवा झाल्यावर वडील लग्नाला मान्यता देतील असं सोनमने प्रियकराला सांगितलं होतं. त्यानंतर सोनम नवऱ्यासोबत हनिमूनसाठी मेघालयच्या शिलाँगला पोहोचली. त्यानंतर सोनमने राज कुशवाहला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक. लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली आहे, असं भासवू, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरून निघाला. एखाद्या भयपटासारखी वाटणारी ही कहाणी नेमकी कशी उलगडली? लग्नापूर्वीच पत्नीने विधवा होण्याचा प्लान कसा रचला होता? त्याचा हा स्पेशल रिपोर्ट.

Published on: Jun 10, 2025 11:18 PM