Mumbai | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
उन्हाळा सुरु झाल्यापासूनच प्रशासन नागरिकांना पाणी जपून वापरण्यास सांगत आहे. पाण्याचा साठा खूप मर्यादित असून मुंबईकरांनी योग्य तितकेच पाणी वापरणे गरजेचे याहे. अलीकडे दक्षिण मुंबईत तीन ते चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचं नेमकं कारण काय?

मुंबईकरांना होणारा पाणी पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी महानगरपालिकेतर्फे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग येथे 1500 मिलिमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काम 16 एप्रिल, गुरूवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, 17 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या काही भागांमध्ये 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Published on: Apr 12, 2026 4:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us