Soybean Price Rise : शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात; सोयाबीनचे भाव 4700 पर्यंत वाढले

Soybean Price Rise : शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात; सोयाबीनचे भाव 4700 पर्यंत वाढले

| Updated on: Apr 28, 2025 | 10:50 AM

Soybean market rates April 2025 : राज्यात शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन भाव वाढत नसल्याने विकून टाकल्यानंतर आता बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाने उसळी घेतली आहे.

राज्यात शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपताच बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले आहेत. प्रती क्विंटल मागे सोयाबीनला आता 4 हजार 7 रुपयांचा भाव मिळत आहे. यापूर्वी हा भाव 4 हजार रुपये होता.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री झालेली आहे. त्यानंतर आता सोयाबीनचे दर वाढायला लागलेले आहेत. एप्रिल महिन्याच्या पाहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात उसळी बघायला मिळत आहे. त्यापूर्वी सोयाबीनचा दर 3 हजार 800 ते 3 हजार 900 पर्यंत होता. त्यानंतर ही दरवाढ सुरू झालेली आहे. सध्या 4 हजार 700 रुपये प्रतीक्विंटल पर्यंत सोयाबीनचा भाव गेलेल्या आहे. हा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

Published on: Apr 28, 2025 10:49 AM