75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना घेऊन पहिलं विशेष विमान मुंबईत दाखल झालेलं आहे. यातून 75 प्रवाशांची तुकडी आणण्यात आलेली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल झाली आहे. स्वत: एकनाथ शिंदे हे काल श्रीनगर येथे गेले होते. त्यांनी पर्यटकांना धीर देत त्यांच्याशी संवाद देखील साधला होता. त्यानंतर आज 75 पर्यटकांना घेऊन पहिल विशेष विमान हे मुंबई विमानतळावर दाखल झालं आहे.
मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर या ठिकाणी अडकलेले पर्यटक हे घाबरले होते. या सर्वांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी विशेष विमानाची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
Published on: Apr 24, 2025 09:04 AM
