Special Report | आम आदमी पार्टीच्या झाडूत पंजा साफ -TV9

| Updated on: Mar 10, 2022 | 9:51 PM

मिळालेल्या विजयामुळे अरविंद केजरीवाल आता दिल्ली आणि पंजाबच्या पुढचं राजकीय भवितव्य त्यांना आता दिसू लागलं आहे. मात्र हा पंजाबचा मोठा विजय आम आदमी पक्षासाठी जितकी मोठी संधी आहे, तितकीच एक आव्हानही असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत

Follow us on

चंदीगड: ‘पहले दिल्ली में इन्कलाब हुआ, अब पंजाब में इन्कलाब हुआ है, अब पूरे देश में इन्कलाब होगा…।‘ पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेले हे यश किती मोठे आहे, हे अरविंद केजरीवाल यांच्या या शब्दांवरुन समजू शकते. या मिळालेल्या विजयामुळे अरविंद केजरीवाल आता दिल्ली आणि पंजाबच्या पुढचं राजकीय भवितव्य त्यांना आता दिसू लागलं आहे. मात्र हा पंजाबचा मोठा विजय आम आदमी पक्षासाठी जितकी मोठी संधी आहे, तितकीच एक आव्हानही असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने इतकी जोरदार मुसंडी मारली आहे की, इतर पक्षांचे दिग्गज नेतेही यामध्ये उद्धवस्त झाले आहेत. कॅप्टन अमरिंदर, सिद्धू, बादल, चन्नी, मजिठिया या नेत्यांना आपने घराचा रस्ता दाखवला आहे. 117 पैकी 91 जागांवर आपने निर्विवाद यश मिळवले आहे.