Special Report | ‘त्या’ क्लिपमधला आवाज संजय राठोड यांचाच?

Special Report | ‘त्या’ क्लिपमधला आवाज संजय राठोड यांचाच?

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 10:02 PM

एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील (Forensic report ) ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (Pune Police) दिली आहे.

माजी वन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) पुन्हा एकदा कॅबिनेटच्या दारापर्यंत आले होते, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची चर्चा होती. मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे (Sanjay Rathod Audio clip) संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे. एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील (Forensic report ) ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (Pune Police) दिली आहे.