Special Report | किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

| Updated on: Jan 28, 2022 | 10:54 PM

'उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा असे सांगितले आहे. माझ्यावर कधी गुन्हा दाखल करणार याची मी वाट पाहत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करावा', असं थेट आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. मी चोरी पकडली याची खुन्नस लिपिकाला नोटीस पाठवून काढत आहेत. ज्यांनी फोटो काढला त्यांना नोटीस दिली नाही. फोटो कोणी काढला हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. पण त्याला नोटीस दिली नाही. त्यांनी त्या लिपिक कुटुंबाची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले.

Follow us on

‘उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा असे सांगितले आहे. माझ्यावर कधी गुन्हा दाखल करणार याची मी वाट पाहत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करावा’, असं थेट आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. मी चोरी पकडली याची खुन्नस लिपिकाला नोटीस पाठवून काढत आहेत. ज्यांनी फोटो काढला त्यांना नोटीस दिली नाही. फोटो कोणी काढला हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. पण त्याला नोटीस दिली नाही. त्यांनी त्या लिपिक कुटुंबाची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले.

नोटीस पाठवून दादागिरी आणि ठोकशाही सुरू असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. गरीब टाईप रायटवर बदला घेण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस काढली असल्याचा सवालही यावेळी सोमय्या यांनी केला. माफिया सेनेची ही गुंडगिरी असल्याचे सोमय्या म्हणाले. प्रताप सरनाईक यांना नोटीस का देण्यात आली नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लढावे गुंड असणाऱ्या प्रताप सरनाईक यांना पाठवू नका असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शैलीची गुंडगिरी सहन करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.