Special Report | हिजाब प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निकाल, शाळांचा निर्णय बंधनकारक

| Updated on: Mar 15, 2022 | 9:30 PM

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे.

Follow us on

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असं सांगतानाच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे. तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसेच या संदर्भातील सर्व याचिकाही कर्नाटक कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कर्नाटकमधल्या शाळेतील हिजाब बंदीवर कोर्टाकडूनही शिक्कामोर्तब झालं आहे. उडूपीच्या मुलींनी कोर्टात याचिका दाखल करून शाळेत हिजाब परिधान करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावताना विद्यार्थी शालेय गणवेश परिधान करून येण्यास नकार देऊ शकत नाहीत, असं कोर्टाने निकाल देताना म्हटलं आहे.

शाळा आणि महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 9 फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, जस्टिस कृष्णा एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांच्या पीठाचं गठन करण्यात आलं होतं. शाळेच्या आत हिजाब घालण्यास परवानगी दिली पाहिजे. कारण हा त्यांच्या अस्थेचा भाग आहे, असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिला.