Special Report | रामदास कदमांचे ठाकरेंवर शाब्दिक बाण !-tv9

Special Report | रामदास कदमांचे ठाकरेंवर शाब्दिक बाण !-tv9

| Updated on: Jul 27, 2022 | 9:30 PM

थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच, रामदास कदमांची आरोपांची मालिकाही काही थांबलेली नाही. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असतानाही मला संपवण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोपही कदमांचा आहे..

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशीच, शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर थेट शाब्दिक वार केलेत…अजूनपर्यंत शिंदे गटानं ठाकरेंवर प्रत्यक्ष टीका करणं टाळलं. पण बाळासाहेबांशी गद्दारी आणि खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केल्याचा घणाघात रामदास कदमांनी केलाय. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपही केलाय…उद्धव ठाकरेंनाच., मराठा नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यामुळं शिंदेंचा राग आहे असा आरोप रामदास कदमांनी केलाय..उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेलाही कदमांनी प्रत्युत्तर दिलंय…शिवसेना कोणाची, यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदेंमधली लढाई निवडणूक आयोगातही सुरु आहे..त्यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे मागितले…त्यावरुनही रामदास कदमांनी चिमटा काढलाय..थेट उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच, रामदास कदमांची आरोपांची मालिकाही काही थांबलेली नाही. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असतानाही मला संपवण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोपही कदमांचा आहे..

Published on: Jul 27, 2022 09:30 PM