Special Report | महाविकास आघाडीला पुरुन उरली भाजपा !

| Updated on: Dec 14, 2021 | 9:43 PM

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पहिली प्रतिक्रिया नोंदवली. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयर यांना एकच मत पडले, यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस अत्यंत मिश्कीलपणे हसले. ते म्हणाले, मला वाटतं की ते एक मत त्यांचं स्वतःतं आहे. ते काँग्रेसमध्ये गेले ही पहिली चूक केली. तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली ती सर्वांनीच पाहिली. त्यामुळे त्यांना जे मत पडलं आहे, तेही काँग्रेसला नव्हे तर छोटू भोयर यांना स्वतःला मिळालं आहे, असं मला वाटतं.

Follow us on

विधान परिषद निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना केवळ एकच मत पडले. काँग्रेसमध्ये त्यांची पूर्ण फसवणूक झाली, अशी चर्चा आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पहिली प्रतिक्रिया नोंदवली. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयर यांना एकच मत पडले, यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस अत्यंत मिश्कीलपणे हसले. ते म्हणाले, मला वाटतं की ते एक मत त्यांचं स्वतःतं आहे. ते काँग्रेसमध्ये गेले ही पहिली चूक केली. तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली ती सर्वांनीच पाहिली. त्यामुळे त्यांना जे मत पडलं आहे, तेही काँग्रेसला नव्हे तर छोटू भोयर यांना स्वतःला मिळालं आहे, असं मला वाटतं.

चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर भाजपने त्यांची विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक सुरू होण्यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीस यांनी आपल्या गळ्यातील विजयाचा हार फडणवीसांच्या गळ्यात घातला. फडणवीसांनी हा हार काढून तो बावनकुळे यांच्या गळ्यात घालून त्यांचं अभिनंदन केलं. फडणवीसांनी गळ्यात हार घालताच बावनकुळे यांना गहिवरून आलं. त्यांनी लगेचचं फडणवीसांना कडकडून मिठी मारली. बराच वेळ त्यांनी फडणवीसांना मिठी मारली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. बावनकुळेंच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीसही अस्वस्थ झाले होते. हे चित्रं पाहून भाजपचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला आणि बावनकुळे यांचं प्रचंड कौतुक केलं.