Special Report | पहिल्याच पावसात मुंबईतील महामार्ग, रस्ते, लोकलसेवाही ठप्प; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

Special Report | पहिल्याच पावसात मुंबईतील महामार्ग, रस्ते, लोकलसेवाही ठप्प; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 9:33 PM

दिवसभर धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेरुळावर पाणी आल्याने लोकल ठप्प झाली.

दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. दिवसभर धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेरुळावर पाणी आल्याने लोकल ठप्प झाली. दिवसभर पाऊस बरसत राहिल्यानंतर वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कामावर पोहोचलेल्या चाकरमान्यांना घरी कसे पोहोचावे हा प्रश्न पडला होता.