Special Report | नारायण राणे म्हणतात, मला इंग्रजीतला प्रश्न समजला, पण…!

| Updated on: Dec 11, 2021 | 11:15 PM

संसदेतील भाषणावरून राणेंना ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी आपली बाजू मांडली. संसदेत विचारण्यात आलेला प्रश्न मला समजला होता. अध्यक्षांना वाटलं तो समजला नसेल म्हणून त्यांनी मला पुन्हा सांगितला. आता तुम्हाला जे काही ट्रोल करायचं ते करा. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात मी माहिती दिली होती. शिवसेनेनी ट्रोल केलं त्यांना काय करायचं ते करू दे. पण आपण सुद्धा याचं उत्तर देवू, असं आव्हानाच त्यांनी शिवसेनेला दिलं.

Follow us on

भाजपने देशाचं ऐक्य तोडण्याचं काम केलं या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य तोडलं नाही. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? दिल्लीत ते शरद पवार यांच्या कार्यालयातच असतात. शिवसेनेचे आहेत असं ते दाखवतात तसे संजय राऊत नाहीत. त्यांनी शिवसेनेत काय केलं? लावालावीचं काम करणं त्याच नाव संजय राऊत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. कनीमोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.