Special Report | भाजपमध्ये पंकजा मुंडेंचं धर्मयुध्द कोणासोबत ?

Special Report | भाजपमध्ये पंकजा मुंडेंचं धर्मयुध्द कोणासोबत ?

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 10:12 PM

मी दु:खी नाही. मला काही मिळालं नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचं सारथ्य होतं. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होतं. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळालं नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.