Special Report | भाजपच्या आंदोलनावरुन ‘सामना’तून हल्लाबोल, नितेश राणेंचंही प्रत्युत्तर

| Updated on: Sep 02, 2021 | 9:50 PM

जनआशीर्वाद यात्रेपासून पुन्हा एकदा पेटलेला झालेल्या राणे आणि शिवसेनेतील वाद शमताना दिसत नाही. मंदिरं सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात भाजपनं ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं. त्यावरुन शिवेसना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केंद्राकडे बोट दाखवत भाजपवर निशाणा साधलाय. त्यानंतर भाजप खासदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या तालिबानी वृत्तीचं दर्शन घडवत केंद्र सरकारकडे बोट दाखवल्याची टीका करत एक ट्विट केलंय.

Follow us on

जनआशीर्वाद यात्रेपासून पुन्हा एकदा पेटलेला झालेल्या राणे आणि शिवसेनेतील वाद शमताना दिसत नाही. मंदिरं सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात भाजपनं ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केलं. त्यावरुन शिवेसना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केंद्राकडे बोट दाखवत भाजपवर निशाणा साधलाय. त्यानंतर भाजप खासदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या तालिबानी वृत्तीचं दर्शन घडवत केंद्र सरकारकडे बोट दाखवल्याची टीका करत एक ट्विट केलंय. नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राणेंची अटक आणि जामीनावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. राणेंच्या त्या वक्तव्यानंतर आणि राज्य सरकारनं राणेंवर केलेल्या कारवाईनंतर सुरु झालेल्या राणे आणि शिवसेनेतील वाद पुन्हा पुन्हा उफाळून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.