Special Report | यूपीचा प्रत्येक मुख्यमंत्री नावं का बदलत सुटतो? -tv9

| Updated on: Jun 02, 2022 | 11:33 PM

राज्य सरकारकडे शहराचं नाव बदलण्याचा अधिकार आहे का? आणि एखाद्या शहराच्या नामांतरात केंद्र सरकारची भूमिका काय असते, हे जाणून घेण्यासाठी उत्तर प्रदेशात कोणता नवा रेकॉर्ड झाला., ते जाणून घेऊयात.

Follow us on

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर व्हावं, उस्मानाबादचं नाव बदलून ते धाराशीव व्हावं,
आणि आता अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतराची मागणी होऊ लागलीय…नेमका नामांतराचा वाद आहे काय., राज्य सरकारकडे शहराचं नाव बदलण्याचा अधिकार
आहे का? आणि एखाद्या शहराच्या नामांतरात केंद्र सरकारची भूमिका काय असते, हे जाणून घेण्यासाठी उत्तर प्रदेशात कोणता नवा रेकॉर्ड झाला., ते जाणून घेऊयात. मागच्या अनेक दशकात झाले नसतील., इतकी नामांतर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी केलीयत. उत्तर प्रदेश सरकारनं ७ ठिकाणांचं नामांतर केलंय आणि अजून 12 ठिकाणांचा नामांतरचा प्रस्ताव आहे. नामांतर झालेल्यांमध्ये पहिलं ठिकाण आहे इलाहाबाद….जे आता बदलून प्रयागराज झालंय. नंतर फैजाबाद रेल्वे स्टेशन, ज्याचं नाव आता अयोध्या रेल्वे स्टेशन करण्यात आलंय… उर्दू बाजारचं हिंदी बाजार झालंय. हुमायूपूरचं हनुमान नगर केलं गेलं, मीना बाजार आता माया बाजार झालाय, मुगलसराय रेल्वे स्टेशन आता पंडित दिनदयाल उपाध्याय स्टेशन नावानं ओळखलं जातं आणि अली नगरचं नाव आर्य नगर करण्यात आलंय..