Dilip Walse Patil | 26 नझलवाद्यांसह मिलिंद तेलतुंबडेचाही खात्मा, गृहमंत्र्यांनी दिली माहिती
गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवादी ठार झाले आहेत.
मुंबई – गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश आलं आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले ही अभिमानाची गोष्ट आहे, त्यासाठी सर्व प्रथम मी पोलिसांचे अभिनंदन करतो असे त्यांनी म्हटले आहे.
