काय सांगताय… मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधील हजारो चमचे गेले कुणीकडे?

काय सांगताय… मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधील हजारो चमचे गेले कुणीकडे?

| Updated on: Apr 15, 2023 | 9:11 AM

VIDEO | देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून चक्क 'या' वस्तू गायब, सूचना लिहिलेला बोर्ड होतोय व्हायरल

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून चक्क चमचे, जेवणाच्या-नाश्ताच्या प्लेट आणि ग्लास गायब झाल्याचे समोर आले आहे. महानगर पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण या उपहारगृहात जेवण अन् नाश्ता मागवतात. परंतु ते खाल्ल्यानंतर ही भांडी उपहार गृहाला परत न पाठवता इतरत्र ठिकाणी ठेवतात. त्यामुळे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास काहीतरी उत्तर दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केले आहे. याकरता एक सूचना फलकच त्यांनी लिहीला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत असल्याचे समोर आले आहे. उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाले आहे. यामुळे यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका, असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. वर्षभरात हजारो भांडी कमी झाली आहे. उपहारगृहाचे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली असून यासंदर्भातील विनंती करणारा फलक कॅन्टीनमध्ये लावण्यात आला आहे.

Published on: Apr 15, 2023 09:04 AM