Nashik | नाशिककरांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न निकाली
नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे
जून महिन्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात नाशिक जिल्ह्याकडे मान्सूनच्या पावसानं पाठ फिरवली होती. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणी साठी 50 टक्केंच्या खाली आल्यानं शहरात दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली.
Published on: Aug 03, 2021 12:42 PM
