Sunetra Pawar | ‘दादांच्या आठवणी कुठे नाहीत…’ पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
देहू नगरीत माऊलींच्या गजरात आणि तुकोबारायांच्या नामस्मरणात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल झाले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालखी सोहळ्याचं जवळच्या छतावरून दर्शन घेतलं.

सुनेत्रा पवार या दरवर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या सोहळ्यात सहभागी होत असत. मात्र यंदा प्रथमच त्या त्यांच्या अनुपस्थितीत येथे आल्याने काहीशा भावूक झालेल्या दिसल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्या म्हणाल्या, “दादांच्या आठवणी कुठे नाहीत… त्यांनी अशा अनेक आठवणी दिल्या आहेत ज्या कायम स्मरणात राहतील.” त्यांच्या बोलण्यातून अजित पवार यांच्यावरील जिव्हाळा आणि भावनिक नातं स्पष्ट दिसून आलं.
यावेळी त्यांनी पंढरपूर वारीबाबतही भावना व्यक्त केल्या. “वारकऱ्यांच्या पावलांची ताल, विठुरायाच्या दर्शनाची आतुरता आणि भक्तीचं वातावरण हे सगळंच माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे,” असं त्या म्हणाल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे पालखी सोहळ्यातील वातावरण अधिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.