tv9 Marathi Special Report | पडद्यामागून थेट सत्ताकेंद्रात: सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यू नंतर आता उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या मृत्यू नंतर आता उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. लग्नानंतर सुनेत्रा पवार यांचा समाजकारणात वावर असला तरी निवडणुकीच्या राजकारणापासून त्या अलिप्त होत्या. राष्ट्रवादी फुटीनंतर सुनेत्रा पवार यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. लोकसभेत पराभव झाला असला तरी राज्यसभेत खासदार म्हणून त्यांची वर्णी लागली. अनेक वर्ष राजकारणापासून लांब राहिलेल्या सुनेत्रा पवार आता थेट राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करत आहेत. या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बारामतीची सून आणि धाराशीवची लेक बसणार आहे.
