50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 5:39 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांतील राऊत आणि ठाकरे यांच्यातील ही दुसरी भेट आहे .

1) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांतील राऊत आणि ठाकरे यांच्यातील ही दुसरी भेट आहे .

2) राज्यातील पोटनिवडणुकांना सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर ओबीसींचा इम्पेरिकल डाटा मिळेपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका रद्द कराव्यात अशी याचिका उद्या दाखल करण्यात येणार आहे.

3) मुंबई बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप नेते प्रविण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

4) कोरोनाची दुसरी लाट संपली नाहीये. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच कोरोनाची तिसरी लाट थोपवली पाहिजे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.